loader
Breaking News
Breaking News
Foto

M-Sand विरुद्धच्या लढ्यात केर ग्रामस्थांना ठाकरे सेनेचा भक्कम पाठिंबा; कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये यांची ठाम भूमिका

तिलारी (प्रतिनिधी) : केर-भेकुर्ली येथे प्रस्तावित M-Sand प्रकल्पाविरोधात विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी विरोधाचा ठराव मंजूर केल्यानंतर या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळू लागला आहे. ठाकरे सेना कोनाळ विभाग प्रमुख तथा मोर्लेचे उपसरपंच संतोष मोर्ये यांनी केर ग्रामस्थांच्या लढ्याला भक्कम पाठिंबा देत, विनाशकारी प्रकल्पांना या भागात कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. केर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना मोर्ये म्हणाले, "पर्यावरणाचा ऱ्हास करून जल, जंगल आणि जमिनीचे नुकसान करणारे प्रकल्प स्थानिकांच्या हिताचे असू शकत नाहीत. ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणासाठी घेतलेली भूमिका योग्य असून, या लढ्यात ठाकरे सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले की, विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या भावना, आरोग्य आणि पर्यावरणाशी तडजोड करणारे प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. ग्रामसभेने एकमताने व्यक्त केलेल्या जनभावनेचा सन्मान करून प्रशासनाने ग्रामस्थांच्या निर्णयाची गंभीर दखल घ्यावी. स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही निर्णय लादण्याचा प्रयत्न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, केर ग्रामसभेत प्रस्तावित M-Sand प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला असून, पर्यावरण, जलस्रोत, शेती आणि स्थानिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या आंदोलनाला आता विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडूनही पाठिंबा मिळत असल्याने M-Sand प्रकल्पाचा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg