loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या उपाध्यक्षपदी गुलजार रमजान डोंगरकर यांच्या निवडीबद्दल भव्य सत्कार

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित, रत्नागिरीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गुलजार रमजान डोंगरकर यांचा भव्य सत्कार व शुभेच्छा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून गुणवत्ता यादीत येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख ₹5,000, शाल, सन्मानचिन्ह (ट्रॉफी) व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गौरव करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये झोया तबरेज मिरकर (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, पडवे उर्दू, ता. गुहागर) हिने इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण तालुका गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक व ग्रामीण जिल्हा गुणवत्ता यादीत नववा क्रमांक प्राप्त केला. हूमेरा साकिब सोलकर (जि.प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, कर्ला उर्दू मुलींची, ता. रत्नागिरी) हिने इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत 132 वा क्रमांक, तर माहिरा सजाकत रोगनगर (जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, पाचल उर्दू, ता. राजापूर) हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 158 वा क्रमांक प्राप्त करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच कार्यक्रमात उर्दू माध्यमातील केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळालेल्या शिक्षकांचाही शाल, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या केंद्रप्रमुखांमध्ये मुनाफ गुहागरकर (कुरधुंडाउर्दू, ता. संगमेश्वर), आसिफ शेख (कडवई उर्दू, ता. संगमेश्वर), नाझिया पटेल ( फुरुस उर्दू, ता. खेड), शबनम पीरखान (सौंदळ उर्दू, ता. राजापूर) आणि मॅक्सिमा पावस्कर (कातली उर्दू, ता. राजापूर) यांचा समावेश होता. तसेच, सेवानिवृत्त शिक्षक अखलाक सावंत यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच रत्नागिरी प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित, रत्नागिरीचे तज्ज्ञ संचालक सतीश सावर्डेकर व सचिन चांदिवडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही शाल, ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष अखलाक परकर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीचे अध्यक्ष दिलीप देवळेकर, शिक्षक नेते बळीराम मोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काजवे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सचिव संतोष पावणे तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मान्यवर व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष हिदायत कासिम नाईक, जिल्हा सचिव मुनाफ नूरमोहम्मद गुहागरकर तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजिम कोतवडेकर यांनी केला उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशाच शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg