loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र शासनाचा ‘UK CETA आणि इतर १० मुक्त व्यापार करार सल्लागार’ तसेच ‘ब्रिटिश दूतावास, मुंबईसाठी विशेष संपर्क अधिकारी म्हणून खेडचे सुपुत्र कौस्तुभ बुटाला यांची नियुक्ती

खेड - महाराष्ट्र शासनाचा ‘UK CETA आणि इतर १० मुक्त व्यापार करार (FTA) सल्लागार’ तसेच ‘ब्रिटिश दूतावास, मुंबईसाठी विशेष संपर्क अधिकारी (SPOC)’ म्हणून खेडचे सुपुत्र कौस्तुभ बुटाला यांची नियुक्ती झाली आहे. नुकताच ताज, कुलाबा येथे ‘CETA in force’ हा भव्य आणि यशस्वी कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री आणि FDI व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी गौतम सिंघानिया, व्यापार संघटनांचे २०० हून अधिक उच्चपदस्थ प्रतिनिधी, व्यावसायिक आणि दोन्ही देशांतील वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच, ब्रिटनचे उप-उच्चायुक्त आणि दक्षिण पूर्व आशियाचे व्यापार आयुक्त हरजिंदर कांग, माझे नवे मित्र आणि ब्रिटिश दूतावासातील द्विपक्षीय व राजकीय संबंध विभागाचे प्रमुख जॉन निकेल, आणि माझे मार्गदर्शक व MMRDA चे संचालक शंकर देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बदलत्या जागतिक राजकीय परिस्थितीमध्ये हा ऐतिहासिक करार दोन्ही देशांसाठी तब्बल ६० अब्ज डॉलर्सच्या (60 Billion) व्यापाराची सुवर्णसंधी खुली करणार आहे. खेडचे सुपुत्र कौस्तुभ बुटाला हे स्व. हिराभाई बुटाला यांचे सुपुत्र आहेत

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg