loader
Breaking News
Breaking News
Foto

भारताच्या लेकीची 'सुवर्ण' कामगिरी!

मुंबई : आपल्या भारताची सुकन्या शर्मिला धनकर हिने 'ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्स २०२६' स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिने या स्पर्धेत महिलांच्या F57 गोळाफेक प्रकारात ९.८१ मीटरचे अंतर गाठत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या इतिहासात पॅरा-ॲथलेटिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रीडा विश्वासाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रकुल खेळांमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. ही कामगिरी अत्यंत गौरवास्पद आणि प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या बळावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या शर्मिला धनकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg