loader
Breaking News
Breaking News
Foto

कुटगिरी येथे लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्यू; नुकसानग्रस्त शेतकर्‍याला १८ तासांच्या आत शासकीय मदत सुपूर्द

रत्नागिरी(जिमाका)- मौजे कुटगिरी येथील भैरी शंकर मंदिरानजीक तिजग नदीवरील लोखंडी साकव काल सायंकाळी कोसळल्याने आठ जनावरे त्यामध्ये अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व आठ जनावरांना बाहेर काढण्यात यश आले. आठ जनावरांपैकी दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीचा एक बैल मृत झाला तर उर्वरीत जनावरे किरकोळ जखमी झाली. पशुवैद्यकीय विभागाने तातडीने जखमींवर उपचार व मृत बैलाचे शवविच्छेदन पूर्ण केले. मृत बैलाच्या अनुषंगाने शेतकरी लिंगायत यांना रक्कम रुपये ३२ हजार रुपये शासकीय आर्थिक सहाय्य धनादेश आज सकाळी ११:३० वाजता उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार गुहागर परिक्षीत पाटील, मंडळ अधिकारी पाटपन्हाळे अनिल राठोड व ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला. प्रांताधिकारी यांनी जखमी जनावरांवर आवश्यक उपचार कायम ठेवण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाला केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg