मालवण (प्रतिनिधी) - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणालाच करिअरचे अंतिम ध्येय न मानता संशोधनाधिष्ठित आणि विज्ञान क्षेत्रातील नव्या संधींचाही विचार करावा, असा प्रेरणादायी संदेश देणारे यश श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय, वायरी-भूतनाथ (ता. मालवण ) येथील माजी विद्यार्थिनी श्रावणी प्रवीण कुबल हिने मिळविले आहे. तिची देशातील नामांकित IIT (BHU), वाराणसी येथे Master of Pharmacy (M.Pharm.) – Pharmaceutical Chemistry या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. श्रावणीने दहावीपर्यंतचे शिक्षण श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर औषधनिर्मिती क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास घेत तिने शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी येथून बी. फार्म. पदवी प्रथम श्रेणी विशेष प्राविण्यासह संपादन केली.
औषधनिर्मिती क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार करून तिने कठोर परिश्रमांच्या बळावर हे यश संपादन केले. आय. आय. टी (बी एच यू ) वाराणसीमध्ये या अभ्यासक्रमासाठी देशभरातून अत्यंत गुणवंत आणि मर्यादित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यामुळे तिची निवड ही विशेष गौरवास्पद मानली जात आहे. Pharmaceutical Chemistry हे औषधांचे संशोधन, नवीन औषधांचा शोध, औषधांची गुणवत्ता व सुरक्षितता, औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान, संशोधन प्रयोगशाळा तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय औषध उद्योगात करिअर घडविणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे. भारतासह जगभरात संशोधन आणि आरोग्य क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असल्याने या शाखेतील तज्ज्ञांची मागणी सातत्याने वाढत आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात करिअरच्या अनेक नव्या वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. योग्य माहिती, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येते, याचे श्रावणीचे यश हे प्रेरणादायी उदाहरण आहे. श्रावणी प्रवीण कुबल हिच्या या उज्ज्वल यशाबद्दल श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक संजय खोचरे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.