खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून विश्वासाला तडा देणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पोस्ट ऑफिसमधील कामाच्या निमित्ताने एका कुटुंबाशी ओळख निर्माण झालेल्या ५६ वर्षीय संशयित आरोपी नरेश बाबाजी मोरे पोस्टमनने आरडीच्या पावत्या लिहिणे, आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांच्या कामाचे आमिष दाखवत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून खेड पोलिसांनी संशयित आरोपी नरेश बाबाजी मोरे (वय ५६, रा. आस्तान, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यासह संबंधित कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. तिचे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याने आरोपीचे त्यांच्या कुटुंबाशी येणे-जाणे होते. पोस्ट ऑफिसमधील आरडीच्या पावत्या लिहिणे, हप्ते भरणे तसेच आधार कार्ड आणि इतर शासकीय कागदपत्रांच्या कामासाठी मुलीची मदत लागेल, असे सांगून आरोपीने तिच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत मुलीला अनेकदा आपल्या घरी बोलावून घेतल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, एप्रिल २०२५ पासून जुलै २०२६ या कालावधीत मुलगी आरोपीच्या घरी गेल्यानंतर लिखाणाचे काम संपल्यानंतर तिच्यावर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आले. जून २०२५ आणि मे २०२६ मध्येही गावात वास्तव्यास असताना विविध कारणांनी मुलगी आरोपीच्या घरी गेली असता तिच्यावर पुन्हा अत्याचार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याचबरोबर, हा प्रकार कोणालाही सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी आरोपीने दिल्याने भीतीपोटी पीडित मुलगी बराच काळ गप्प राहिल्याचे तिने आईला सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, मुलीला काही महिन्यांपासून मासिक पाळी न आल्याने आणि तिच्या वागण्यात बदल जाणवल्यामुळे आईला संशय आला. सुरुवातीला रक्ताच्या कमतरतेमुळे पाळी आली नसावी, असा समज कुटुंबाचा झाला होता. मात्र २८ जुलै २०२६ रोजी प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडितेने आरोपीकडून झालेल्या कथित अत्याचाराची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे खेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध ’पोक्सो’ कायदा तसेच इतर संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. या घटनेमुळे खेड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.