loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा ९ ऑगस्टला

सावंतवाडी(प्रतिनिधी)- कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व सदस्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दीपक पेटकर व सचिव राजू तावडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाच्या नफा-तोटा पत्रकाचे वाचन करून त्यास मान्यता देणे आणि आर्थिक वर्षातील जमा-खर्चाला मंजुरी देणे यावर चर्चा होणार आहे. याशिवाय आगामी वर्षात आयोजित करावयाच्या विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत चर्चा करून निर्णय घेणे, तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणार्‍या इतर विषयांवर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg