loader
Breaking News
Breaking News
Foto

बुरंबी–संगमेश्वर राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; अपघातांची मालिका सुरू

संगमेश्वर, (प्रतिनिधी) : संगमेश्वर–देवरुख राज्यमार्गावरील बुरंबी ते संगमेश्वर दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. विशेषतः लोवले आणि बुरंबी परिसरात सर्वाधिक खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहने थेट खड्ड्यांमध्ये जात असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मार्गावरील खड्डे बुजविण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे "सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेमके करतात तरी काय?" असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाहनचालक व ग्रामस्थांनी तातडीने या मार्गाची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg