loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड तालुका महिला व्यापारी संघाची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर

देवगड - देवगड तालुका महिला व्यापारी संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रियांका साळसकर यांची महिला व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वावर महिला व्यापाऱ्यांनी पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. संघाच्या उपाध्यक्षपदी मनीषा उत्तम पोकळे (देवगड), स्वरूपा समीर सोमण (मिठबाव) आणि उर्मिला मणचेकर (पडेल) यांची निवड करण्यात आली. सचिवपदी वैशाली मनोज हडकर, तर सहसचिवपदी कृपा जितेश भद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय संघाच्या कार्यकारिणीवर तृप्ती प्रसाद पारकर, शीतल शैलेश कदम, वैष्णवी सुधाकर जोईल, मनीषा रमेश पाटील, ऋचा राजेश पोकळे, शमा सुनील कुळकर्णी, स्मिता तुषार पवार, सानिका शुभम कुळकर्णी, चिन्मयी वैभव बिडये, प्रिया मधुकर नलावडे, स्नेहा सदानंद हिंदळेकर, प्राजक्ता प्रशांत बांदेकर, अनघा अमोल काणेकर, गीतांजली सचिन हळदणकर, स्वरा सुधीर पारकर, दिपाली नितीन घाडी, शीतल सुरेश तावडे, मंजिरी मधुसूदन काळे, माधवी मधुकर लडगे, तन्वी योगेश चांदोस्कर, पूजा प्रसाद वाडेकर, सुप्रिया पांडुरंग लिमये, सायली संतोष माणगावकर, प्रीतम प्रकाश कोळंबकर आणि माधुरी विश्वामित्र खडपकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य प्रसाद पारकर यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महिला व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देणे, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि व्यापारी क्षेत्रात महिलांचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg