दोडामार्ग(प्रतिनिधी)- दोडामार्ग तालुक्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय असे यांचे जनतेच्या समस्या सुरक्षा याकडे लक्ष नसल्याने आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दोडामार्ग ते विजघर हा बेळगाव कोल्हापूर, दोडामार्ग, गोवा मुख्य राज्य मार्ग आहे. या दोडामार्ग ते विजघर मार्गावर पंधरा ते वीस झाडे धोकादायक जीर्ण आहेत तुकडे पडत आहेत जीवित हानी होण्याची शक्यता आहे. असे असताना दोडामार्ग संबंधित ठेकेदार आपत्ती व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत आहेत. या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी तिलारीवाडी जीर्ण झाडाच्या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर शेटवे यांनी दोडामार्ग तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
दोडामार्ग ते विजघर मार्गावर किशोर शेटवे यांच्या घराजवळ मुख्य रस्त्यावर भले मोठे आंब्याचे झाड जीर्ण झाले आहे. पाऊस सुरू आहे. यामुळे झाडाच्या फांद्या तुटून पडत आहेत. वीज वाहिन्या तुटत आहेत. या रस्त्यावर हजारो वाहने ये जा करतात शिवाय बाजूला जिल्हा परिषद शाळा आहे. मुले ये जा करतात. यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो. सदर धोकादायक जीर्ण झाडाबाबत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय कर्मचारी यांच्या निदर्शनास बाब आणून देखील शिवाय रस्ता काम करणार्या ठेकेदार याला सांगून देखील तोडले नाही. यावरून प्रशासकीय अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कुणाचा बळी जातो याची वाट पाहत आहे काय? असा सवाल नागरीकांच्या वतीने किशोर शेटवे यांनी उपस्थित केला.
दोडामार्ग तालुक्यात आज हजारो झाडे तोडली जात आहेत. मग लोकांच्या जीवाला हानिकारक ठरणार्या या झाडांना प्रशासकीय अधिकारी यांचा अभय कशासाठी? दोडामार्ग ते विजघर मार्गावर जवळपास तीस ते चाळीस झाडे धोकादायक जीर्ण आहेत. दोडामार्ग ते विजघर मार्गावर प्रवास करणारे प्रवासी नागरिक, पादचारी, विद्यार्थी, वाहन चालक यांच्या जीविताला धोका पोहोचू शकणारे हे झाड तातडीने तोडले नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी झाडाच्या ठिकाणी तिलारीवाडी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा किशोर शेटवे यांनी दिला आहे. दोडामार्ग तहसीलदार, दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.