loader
Breaking News
Breaking News
Foto

स्वरूप संगीत विद्यालय आयोजित रविवार १६ ऑगस्टला ‘गुरुवंदना’ कार्यक्रम

संगमेश्वर (प्रतिनिधी) - स्वरूप संगीत विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ संगीतगुरू गिरीधर कुलकर्णी यांच्या गुरुपूजनानिमित्त ‘गुरुवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मातृमंदिर चौक, देवरुख येथील लोकमान्य वाचनालय हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सत्काराने होणार असून, त्यानंतर गुरुपूजन करण्यात येणार आहे. स्वरूप संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विविध वाद्यांचे वादन सादर केले जाणार आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गिरीधर कुलकर्णी यांचे तबला वादन तसेच कोल्हापूर येथील प्रसिद्ध गायक नितीन मुनीश्वर यांचे गायन. त्यांच्या गायनाला तबल्याची साथ गिरीधर कुलकर्णी, तर संवादिनीची साथ अमित साळोखे देणार आहेत.

टाईम्स स्पेशल

गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणाऱ्या या विशेष संगीत कार्यक्रमाचा संगीतप्रेमी व रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा आणि गुरुपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वरूप संगीत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg