loader
Breaking News
Breaking News
Foto

आसामच्या महापूरात १०० जणांचा मृत्यू, ७ जिल्ह्यात आपात्कालिन स्थिती

रत्नागिरी (टाइम्स डेस्क) - आसाम राज्यात महापूराची स्थिती गंभीर असून आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महापूरात अजूनपर्यंत १०० नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आसाम राज्य आपदा प्रबधंन प्राधिकरणाने सांगितले की, गेल्या २४ तासात गोला घाट आणि कार्बी आंगलोंग जिल्ह्यात महापूराची स्थिती गंभीर असून या दोन्ही जिल्ह्यात दोघांना रविवारी जीव गमवावा लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हवामान खात्याच्या अंदाजानुसार चराईदेव, दरांग, गोलाघाट, जोरहाट,कार्बी आंगलोंग, नगाव आणि शिवसागर जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ५०० लोक प्रभावित आहेत. त्यामध्ये गोलाघाट जिल्ह्यात सर्वाधिक लोकांना महापूराचा तडाखा बसला आहे. सुमारे ७० हजार लोक महापूरात सापडले आहेत. शिवसागर जिल्ह्यात ४० हजार आणि जोरहाटमध्ये १६ हजार लोक महापूराने प्रभावित आहेत. ६ जिल्ह्यात मदतकार्य शिबीरे सुरु असून ४९ हजार लोकांनी या शिबीरात शरण घेतले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg