बांदा (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, वक्तृत्वकला आणि सर्जनशील विचारांना चालना देण्याच्या उद्देशाने कोंडुरा येथील पारिजात मंगल कार्यालयात कै. विद्याधर शिरसाट स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कथाकथन स्पर्धेचे आयोजन शुक्रवार १ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या या स्पर्धेत परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये होणार आहे. गट क्रमांक १ मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाची वेळ ५ मिनिटे, तर गट क्रमांक २ मध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ७ मिनिटे निश्चित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके, स्मृतिचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरणार असल्याने पालक व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी अमोल आरोसकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.