loader
Breaking News
Breaking News
Foto

जामसंडे वळकुवाडीत घरावर आंब्याचे झाड कोसळले; लाखोंचे नुकसान

देवगड - देवगड तालुक्यातील जामसंडे-वळकुवाडी येथे रविवारी दुपारी साडे दोन वाजण्याच्या सुमारास जोरदार वार्‍यामुळे आंब्याचे झाड घरावर कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत आनंद नारायण धुरी यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जोरदार वार्‍यामुळे आंब्याचे झाड अचानक घरावर कोसळले. यामध्ये आनंद धुरी यांच्या घराच्या छतासह अन्य भागाचे मोठे नुकसान झाले. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी भाजप महिला उपाध्यक्ष मृणाली भडसाळे, महेश भडसाळे, नगरपंचायत कर्मचारी प्रदीप लाड, कुंदन घाडी, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, सचिन घाडी, सचिन राऊत, निलेश कणेरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, तातडीची मदत म्हणून मृणाली भडसाळे यांनी धुरी कुटुंबीयांना ताडपत्री उपलब्ध करून दिली. रविवारी तांत्रिक अडचणीमुळे नुकसानीचा पंचनामा होऊ शकला नाही. मात्र, सोमवारी संबंधित यंत्रणेकडून नुकसानीचा रीतसर पंचनामा करण्यात येणार आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आनंद धुरी यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करून तातडीने मदत मिळवून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg