loader
Breaking News
Breaking News
Foto

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने कशेडी मठामध्ये कोकणकन्या तन्वी रेडिजचा भव्य सत्कार

खेड (दिलीप देवळेकर) - श्री स्वामी समर्थ मठ कशेडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने साजरा झाला. यावेळी हजारो स्वामीभक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मठामध्ये कोकण कन्या तन्वी रेडिज (लोटेमाळ ता‌ खेड) हीने अहमदाबाद येथे पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. याबद्दल श्री स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त अंकुश काते व शेलार यांचे हस्ते शाल श्रीफळ व स्वामी समर्थांचा फोटो देऊन गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मठाचे व्यवस्थापक समिरदादा मोरे, माजी उपसभापती विश्वासराव दळवी, कशेडी गावचे माजी सरपंच सुरेशराव दरेकर, रविकांत वालणकर, अमित अंधेरे, दिलीप दरेकर, निलेशदादा वाडकर, नामदेवशेठ शेलार, लक्ष्मण मोरे, सुरेश शिंदे, नागेश शिर्के, भानुदास कदम, अनिल अंधेरे, रोहनदादा वाडीले, शामदादा कळंबे, अशोककाका गळांगे, गणेश निवाते, गुणदेकर, पंकज शेठ, महीला सेवेकरी उपस्थित राहून गुरूपौर्णिमा उत्सव सर्वांचे सहकार्याने पार पडला. यावेळी अन्नदाते भक्तांचा सन्मान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg