loader
Breaking News
Breaking News
Foto

"परंपरा महाराष्ट्राची... भक्ती विश्वासाची... दुबईमध्ये घुमला विठ्ठल नामाचा गजर.. एकादशी साजरी

अलिबाग, (वार्ताहर) - जगाच्या कानाकोपर्यंत पोहचलेला मराठी माणूस हा अजूनही मराठी संस्कृतीशी जोडला गेला आहे. दिवाळी असो, दसरा असो, गणेशोत्सव असो सर्व सण परदेशात राहूनही तितक्याच आनंदाने साजरे केले जातात. नुकतीच साजरी झालेली आषाढी एकादशी आखाती देशातही साजरी झाली. दुबईमध्ये मराठी मंडळाने विठ्ठल नामाचा गजर केला. आणि "परंपरा महाराष्ट्राची.. भक्ती विश्वासाची " हा संदेश दिला. अशी माहिती दुबईस्थित समीर देवेंद्र चौगुले यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुबईतील ११ व्या आषाढी वारी सोहळ्याचे श्री गणेश भजनी मंडळ, शारजाह यांनी नियोजन केले होते. त्या निमित्ताने निर्माण झालेले भक्तिमय वातावरण खरोखरच अविस्मरणीय होते. वारी, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात हजारो भाविक भक्तिरसात तल्लीन झाले. परदेशात राहूनही महाराष्ट्राची संस्कृती, वारकरी परंपरा आणि भक्तीभाव जपण्याचे हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.असे समीर यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

या पवित्र सोहळ्यात धनविन रेस्टॉरंट, करामा यांचा ट्रॉफी देऊन केलेला सन्मान अत्यंत अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण होता, असे समीर चौघुले म्हणाले. या सन्मानासाठी श्री गणेश भजनी मंडळ, शारजाहचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि या सोहळ्याच्या यशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. सन्मान हा आम्हाला अधिक उत्साहाने समाजकार्य आणि सेवाभाव जपण्याची प्रेरणा देणारा आहे, असे समीर म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg