loader
Breaking News
Breaking News
Foto

पंचनदी येथे कृषी विद्यार्थिनींतर्फे आंब्याच्या छाटणीचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दापोली (सागर गोवळे) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी 'ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा'अंतर्गत (RHWE) पंचनदी येथे 'आंब्याची छाटणी' या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. आंबा बागेचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे प्रात्यक्षिक स्थानिक प्रगतिशील शेतकरी धनंजय जोशी यांच्या आंबा बागेत प्रत्यक्ष करून दाखवण्यात आले. ​कार्यक्रमादरम्यान फळशास्त्र विभागाचे आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी अजित सारंगकर आणि संजय ढवळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंब्याच्या झाडांची नियमित व योग्य छाटणी केल्यास झाडांची जोमदार वाढ होऊन भविष्यात अधिक आणि दर्जेदार उत्पादन मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रात्यक्षिकातील प्रमुख मुद्दे: पुनरुज्जीवन: जुन्या व कमी उत्पादन देणाऱ्या झाडांची क्षमता वाढवण्यासाठी योग्य छाटणी करणे. ​आरोग्यदायी वाढ: सुकलेल्या, कीडग्रस्त व रोगग्रस्त फांद्या वेळेवर काढून टाकणे. ​संतुलित आकार: सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी झाडाला योग्य आकार देणे. ​छाटणीनंतरचे व्यवस्थापन: छाटणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक अन्नद्रव्ये आणि रोग-कीड नियंत्रण व्यवस्थापन करणे.

टाईम्स स्पेशल

या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांच्या अनेक शंकांचे निरसन झाले असून, त्यांनी हे आधुनिक तंत्रज्ञान स्वतःच्या बागांमध्ये वापरण्याची तयारी दर्शवली आहे. ​हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. गार्गी शिर्के, प्राध्यापक डॉ. निलेश दळवी, डॉ. सुमेध थोरात व डॉ. प्रज्ञा गुडदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विद्यार्थिनी श्रेया कर्पे, उन्नती धोडी, निशा घोरपडे, स्वप्नाली जाधव, कोमल कडू, गायत्री कुंभार, रसिका मासये, समृद्धी आंबेकर, आदिती आंबे, श्रुती गोरीवले, सानिया राहटे, प्राची येलवे आणि सोनाली खर्चे यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg