loader
Breaking News
Breaking News
Foto

वीकेंडला कुठे जायचं? मग रत्नागिरीतील धाकटे मांडवे वाडिचा भन्नाट धबधबा तुमची वाट पाहतोय

खेड - शहराच्या गडबडीतून कंटाळा आला आहे? शांत, थंडगार आणि निसर्गाच्या कुशीत एक दिवस घालवायचा आहे? मग रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांडवे गावातील धाकटे मांडवे वाडीचा धबधबा तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण ठरत आहे. डोंगरावरून कोसळणारं पांढरं शुभ्र पाणी, सभोवताली हिरवीगार झाडं, आणि धबधब्याखाली उभं राहिल्यावर मिळणारा थंडगार अनुभव एकदा इथे आलात की परत जायची इच्छा होणार नाही. इथले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. प्रत्येक कोनातून हा धबधबा एकदम इंस्टा-परफेक्ट दिसतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वीकेंडला मित्र-परिवारासोबत येण्यासाठी एकदम बेस्ट स्पॉट असेही म्हटले जातेय. या ठिकाणी नैसर्गिक पाण्यात मजा आणि मनाला शांतता दोन्ही मिळतात. महत्त्वाचं म्हणजे हा स्पॉट अजूनही फारसा गर्दीचा नाही. त्यामुळे तुम्ही निसर्गाचा खरा आनंद घेऊ शकता. मग या वीकेंडला प्लॅन करा धाकटे मांडवे वाडी, मांडवे गाव, खेड, रत्नागिरी! आणि सोबतच सुरक्षिततेची काळजी घ्या, धोकादायक ठिकाणी जाऊ नका, असेही आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg