loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - समूह साधन केंद्र प्रभानवल्ली अंतर्गत जिल्हा परिषद शाळा प्रभानवल्ली क्र. १ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख विक्रम शिंदे होते. परिषदेची सुरुवात दीपप्रज्वलन व उद्घाटनाने झाली. यावेळी केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख विक्रम शिंदे यांचा केंद्राकडून यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मित्र उपक्रमांतर्गत आनापान (विपश्यना) या विषयावर मार्गदर्शन विक्रम शिंदे व संतोष पडवणकर यांच्याकडून करण्यात आले. तसेच शेडे यांनी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना व पुनर्गठन या महत्त्वाच्या विषयाची सखोल माहिती दिली त्यानंतर CRG स्थापना व कार्य या विषयावर संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले. नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम – देवाण-घेवाण व चर्चा सत्र या विषयाचं महत्व रुचिरा माने यांनी समजावून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच प्रशासकीय कामकाज व इतर विषयांवर केंद्रप्रमुख शिंदे यांनी मौलीक मार्गदर्शन करून शिक्षकांमध्ये विचारांची देवाण-घेवाण करण्यात आली. यावेळी प्रभानवल्ली केंद्रासाठी शरद मदने यांची भांबेड केंद्र येथे केंद्रप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रभानवल्ली केंद्राचे माजी केंद्रप्रमुख संतोष पडवणकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रशाळेचे मुख्याध्यापक महेश शेडे, संतोष जाधव, रुचिरा माने, श्रीपत इंदुलकर, वर्षा ढोले, सुभाष बागडी, मयुरी शिवदास, दत्तात्रय जगताप, जयश्री रक्ताडे, जुबेर, मुख्तार शेख, वैभव चौघुले, अमोल राठोड तसेच प्रभानवल्ली केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी सावंत यांनी केले. तर श्रीपत इंदुलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना शैक्षणिक, प्रशासकीय तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण-घेवाण करण्याची उत्तम संधी मिळाली असून, अशा परिषदांमुळे शिक्षणाची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg