loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका तेली समाज युवक समिती अध्यक्षपदी समाधान रहाटे यांची निवड

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर अंतर्गत स्थापन झालेल्या गुहागर तालुका तेली समाज युवक समिती अध्यक्षपदी पालपेणे तेलीवाडी येथील समाधान रहाटे यांची निवड करण्यात आली. गुहागर तालुका तेली समाज युवा समितीची बैठक शृंगारतळी येथे पार पडली. तेली समाज उपाध्यक्ष गजानन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यावेळी संघाचे सचिव प्रविण प्रकाश रहाटे तसेच कार्यकारिणी सदस्य सुधाकर रहाटे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी युवक समिती प्रमुख पदी समाधान रहाटे (पालपेणे), युवा उपयुवा प्रमुखपदी संजीव रहाटे (पिंपर), सचिवपदी रुपेश किर्वे (वेळंब), खजिनदारपदी शुभम लांजेकर (झोंबडी) यांची एकमताने निवड करण्यात आली. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना समाजाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच पुढील समाजाच्या सर्वांगिण कामांसंदर्भात नियोजन व चर्चा विनिमय करण्यात आली. तसेच यावेळी युवा समिती प्रमुख समाधान रहाटे यांना संघटनेची ध्येय, धोरणे, नियम व नियमवली याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सध्याच्या स्थितीमध्ये करण्यात येत असलेली कामे व समाजासाठी करण्यात येत असलेली कामे याची माहिती देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

यावेळी बोलताना युवा समिती प्रमुख समाधान रहाटे यांनी सांगितले की, मुख्य समितीच्या बरोबर राहून सर्व युवकांना एकत्रित करून समाजाची ध्येय धोरण पूर्ण करण्यासाठी एकजुटीने काम करणार असून तालुक्यातील सर्व युवकांनी समाजाच्या विकास प्रकियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी निलेश रसाळ, संजीव रहाटे, समीर रहाटे, गणेश रहाटे, स्वप्नील झगडे, अक्षय राऊत, प्रशांत रहाटे, ओंकार झगडे व तालुक्यातील युवक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg