loader
Breaking News
Breaking News
Foto

गवा रेड्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, उपजिल्हा रुग्णालयात दाखल

सावंतवाडी- सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंग, गोठावेवाडी येथील शेतकरी सोमण विठ्ठल घावरे,( ७० वर्ष) यांच्यावर गवा रेड्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ते गंभीर झाले असून, त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घावरे हे आपल्या भात शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता गवा रेड्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली आहे. ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करून, प्राथमिक उपचार करून, त्यांना पुढील उपचारासाठी, उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

सध्या गवेरेडे वावर वाढला असून, त्यांनी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आताच कोठे शेतीची कामे संपत आली आहेत. मात्र, या जंगली प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg