loader
Breaking News
Breaking News
Foto

मिझू कोकण बेड अँड ब्रेकफास्ट रिसॉर्ट ही पर्यटकांना नवीन संधी डॉ. विनय नातू

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मिझू कोकण बेड अँड ब्रेकफास्ट रिसॉर्ट ही कसबा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना नवीन संधी असून आतिथ्य उद्योगाच्या क्षेत्रात अतिशय उत्तम रीतीने कोकणी पण जपत दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प जि.प.माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांची यशोगाथा मधून नावलौकिकाला येईल असा ठाम विश्वास सिंधु समृद्ध योजना २.०० चे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी विझू कोकण बेड अँड ब्रेकफास्टला भेट दिल्यावर विश्वास व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रिसॉर्टमध्ये रिसॉर्ट चे मालक आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांनी विनय नातू यांचे यथोचीत स्वागत केले. यावेळी श्रीनिवास पेंडसे, दिलीप बडद, श्रीरंग कुंभार, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक जाधव यांची उपस्थिती होती. कसबा येथील छत्रपती संभाजी स्मारक आणि कर्णेश्वर मंदिर, नायरी धोधावणे धबधबा, किल्ले प्रचित गड, श्री भैरीभवानी मंदिर, महाराणी येसूबाई स्मारक, शृंगारपूर काटभारले येथील मल्लोजीराव घोरपडे समाधी, रामेश्वर पंचयातन मंदिर कळंबस्ते साटलेवाडी श्रद्धा स्थळांच्या मध्यवर्ती असलेले हे रिसॉर्ट पर्यटकांच्या प्रथम नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास नातू यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg