loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या निधनावर निलेश राणे यांनी व्यक्त केला शोक

रत्नागिरी : भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाबद्दल रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार तथा कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (ट्वीट) द्वारे शोक व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निलेश राणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “माझे जुने सहकारी व भाजपचे माजी दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अकस्मात निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. या दुःखद प्रसंगी सावंत कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.”

टाईम्स स्पेशल

राजेश सावंत यांच्या निधनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून, विविध राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. निलेश राणे यांनीही आपल्या संदेशातून दिवंगत राजेश सावंत यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करत सावंत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg