loader
Breaking News
Breaking News
Foto

मिसिंग लिंकच्या बोगद्यात मृत्यूचा थरार; भरधाव फॉर्च्युनरची टेम्पोला धडक, युवा नेत्याचा अंत

संगलट(खेड)(प्रतिनिधी)- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगद्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणार्‍या टोयोटा फॉर्च्युनरने समोरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पिंपरी-चिंचवडमधील युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी, तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली असून अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना शुक्रवारी पहाटे सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंकच्या बोगद्यात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने फॉर्च्युनरने पुढे जाणार्‍या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की फॉर्च्युनरच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

टाइम्स स्पेशल

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, आयआरबीचे देवदूत पथक आणि बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर आडवी झाल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवण्यात आली होती. क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. चालकाचे नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, याचा तपास महामार्ग पोलीस करीत आहेत. तुषार भूमकर यांच्या अकाली निधनाने वाकड, भूमकर चौक परिसरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg