मंडणगड (प्रतिनिधी) : बदलत्या हवामानामुळे पावसाची सुरुवात उशिरा झाली त्यामुळे आधीच खोळंबलेल्या भात लावणीच्या कामांनी हैराण झालेल्या मंडणगडातील शेतकऱ्यांनी पाणी टंचाईच्या समस्येवर मात करत मोठ्या कौशल्याने मेहनत करून भात लावणीची कामे पुर्ण केली. भात लावणी ही महाराष्ट्रातील पावसाळ्याच्या हंगामातील एक महत्त्वाची शेती प्रक्रिया असून, भाताच्या रोपांची लागवड करण्याची पारंपरिक पद्धत आहे. ही प्रक्रिया केवळ कृषी तांत्रिक कार्य नसून, ती एक सामाजिक, सांस्कृतिक व पारंपरिक उत्सव मानला जातो. अशी ही उत्सवरुपी असलेली भात शेतीची परंपरा शेती करण्याचे सोडून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमीनी ओसाड पडलेल्या आहेत. त्याला कारणही तशीच आहेत. एकीकडे लहरी पडणारा मौसमी पाऊस दुसरीकडे रोजगारासाठी मोठ्या शहरात स्थलांतरीत झालेली कुटुंबे यामुळे सध्या गावात तुरळक वस्ती आहे.
त्यामुळे शेती कामाला मजुरच मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती असताना त्यातही काही जण आपली पारंपरिक शेती टिकवून आहेत. कोकणातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. येथे भात हे प्रमुख पीक घेतले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी प्रथम शेताची मशागत करतात. नांगरणी करून शेतात पाणी साचवले जाते. त्यानंतर रोपवाटिकेत तयार झालेली भाताची रोपे उपटून मुख्य शेतात लावली जातात. यालाच भात लावणी असे म्हणतात. भात लावणी ही अत्यंत कष्टाची प्रक्रिया आहे. शेतात गुडघाभर चिखल आणि पाणी असताना तासन्तास वाकून काम करावे लागते. येथे विविध प्रकारच्या भाताच्या जातींची लागवड केली जाते. स्थानिक हवामान आणि जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या जाती निवडल्या जातात. पारंपरिक जातींबरोबरच सुधारित जातींचाही वापर वाढत आहे.
आज आधुनिक यंत्रसामग्रीमुळे काही ठिकाणी भात लागवडीच्या पद्धती बदलत असल्या तरी बहुतांश भागात अजूनही पारंपरिक पद्धतीनेच भात लावणी केली जाते. डोंगराळ भौगोलिक रचना, लहान शेतजमिनी आणि भरपूर पाऊस यामुळे यंत्रांचा वापर सर्वत्र शक्य होत नाही. त्यामुळे मानवी श्रमांचे महत्त्व आजही कायम आहे. सध्या हवामानातील बदल, अनियमित पाऊस, मजुरांची कमतरता आणि शेतीचा वाढता खर्च यांसारखी अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर आहेत. तरीही कोकणातील शेतकरी जिद्दीने शेती करत आहेत. शासनाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांच्या मदतीने उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा या मंडणगड तालुक्यातील भातशेतीच्या लावणीची कामे आटोक्यात आली आहे ही बाब तालूक्यासाठी समाधानाची आहे.











































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.