देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील चालू असलेल्या दुपारची रत्नागिरी-चाफवली आणि सायंकाळ ४.३० वा. साखरपा-चाफवली या दोन एस.टी. बसेस रस्त्याला मोठी झाडी वाढल्याने बंद झाल्या आहेत. रस्त्याच्या बाजूची छोटी झाडी कापली जाते मात्र रस्त्यावर आलेली मोठी झाडे तशीच ठेवल्याने या एस. टी. फेऱ्या बंद झाल्या आहेत. करवंजेवाडी, सरोदेवाडी, रावणवाडी, मधली वाडी, जोगीलटेंबा, तळीवरची वाडी, बौद्ध वाडी, भटाचा कोंड, भोयरेवाडी या वाड्यांना एस.टी.बंद झाल्याने शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे मोठे हाल होत असून याबाबत कोणीही लक्ष देत नसल्याची तक्रार विद्यार्थी वर्गाने व पालकांनी केली आहे.
पाली महाविद्यालयातून येणारे विद्यार्थी दुपारच्या रत्नागिरी चाफवली या गाडीने येत असत तर सायंकाळच्या 4.30 वाजता च्या गाडीने देवळे हायस्कूलमध्ये जाणारे विद्यार्थी चाफवलीत येत असत. मात्र गेले पंधरा-वीस दिवस या गाड्या रस्त्याला आलेल्या झाडीमुळे बंद करण्यात आल्या असून त्या देवळे येथून परत जातात. मात्र याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित पालकांनी सांगूनही कोणीही लक्ष देत नसल्याच्या तक्रार पालक वर्गाची आहे. रत्नागिरी डेपोच्या रत्नागिरी-चाफवली या गाडीवरील चालक वाहकाने झाडी तोडण्यासाठी आम्ही पैसे देतो पण ही झाडे तोडून घ्या, असेही गावातील काही जबाबदार व्यक्तींना सांगितले. परंतु आज पर्यंत रस्त्यावरील मोठी झाडे न तोडल्यामुळे या बसेसच्या फेऱ्या चाफवलीत बंद आहेत. एस.टी.चे आरसे ही या झाडीमुळे तुटल्याचे चालक वाहक सांगितले. या बंद झालेल्या एसटी बसेस ला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी वर्गाचा आहे.
चाफवलीच्या या रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थिनींना झाडी झुडपातून जाताना गवा रेड्यांची व वाघाची भीती असल्याने या एस.टी. बसेस त्वरित चालू करण्यासाठी करवंजे वाडी, रावणवाडी, बौद्धवाडी या रस्त्यावरील झाडे त्वरित तोडून बंद झालेल्या एसटी बसेस फेऱ्या त्वरित चालू कराव्यात अशी विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक, ग्रामस्थ वर्गाची मागणी आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.