loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत कोकणनगर येथील रेशन दुकान सील

रत्नागिरी - शहरातील कोकणनगर येथील शासकीय रास्त धान्य दुकानातील कथित गैरकारभार आणि ग्राहकांची होणारी अडवणूकी विरोधात नागरिकांचा उद्रेक झाला. गेल्या अनेक दिवसांपासून वेळेत रेशन न मिळणे, अपुरा माल देणे आणि अरेरावीच्या वागणुकीला कंटाळलेल्या नागरिकांनी दुकानासमोर एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला. अखेर प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजिया तनवीर मुजावर यांच्या पाठपुराव्यानंतर पुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत गंभीर अनियमितता आढळलेल्या हे रेशन दुकान तातडीने सील केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणनगर येथील रेशन दुकानदार सचिन गोठणकर यांच्या मनमानी कारभाराबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी नगरसेवक केतन शेट्ये आणि नगरसेविका फौजिया मुजावर यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुरवठा विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी लावून धरली. त्यानुसार पुरवठा निरीक्षण अधिकारी निशा पाइकराव आणि सायली चव्हाण यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली. अधिकार्‍यांसमोर गार्‍हाणे मांडताना नागरिकांनी सांगितले की, दुकानातून एकाच वेळी संपूर्ण रेशन न देता कधी फक्त गहु तर कधी तांदूळ दिले जातात. एकाच महिन्याच्या धान्यासाठी वारंवार फेर्‍या माराव्या लागत असल्याने सर्वसामान्यांचा वेळ आणि पैशांचा नाहक अपव्यय होत आहे.

टाइम्स स्पेशल

नियमित धान्य न मिळणे, वजनात मारणे आणि विचारणा केल्यास उद्धटपणे बोलणे यांमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. पुरवठा अधिकार्‍यांनी उपस्थित नागरिकांच्या लेखी तक्रारी नोंदवून घेत दुकानाची प्राथमिक तपासणी केली. तपासणीत गंभीर त्रुटी आणि नियमभंग निष्पन्न झाल्याने अधिकार्‍यांनी संबंधित रास्त धान्य दुकान तत्काळ सील केले. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे कोकणनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांच्या धान्यावर डल्ला मारणाचा प्रकार सुरू होता. त्यांना त्रास देणार्‍या दोषींवर कडक कारवाई होईपर्यंत आणि येथील रेशन वितरण व्यवस्था सुरळीत होईपर्यंत आमचा पाठपुरावा असाच सुरू राहील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg