संगमेश्वर (प्रतिनिधी) - कोकणातील विद्यार्थ्यांचं रानभाज्यांजवळ असणारं नातं खूप जवळचं आहे. तरीही पावसाळी हंगामात रानभाज्या कां खाव्या, कोणत्या रानभाज्या आरोग्याला पोषक आहेत ? तसेच कोणत्या रानभाज्या खाऊ नयेत याचे विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान व्हावे या उद्देशाने व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आज रानभाज्या महोत्सव आणि विक्री असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या शाळेत आणून त्याच्या विक्रीची दुकानं मांडली होती. प्रशालेतील शिक्षकांनी या महोत्सवा विषयी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात पावसाळ्यात जंगलात व रानात उगवणाऱ्या पौष्टिक आणि औषधी वनस्पतींची ओळख व विक्री करण्यासाठी रानभाज्या महोत्सव भरवला जातो. यादरम्यान प्रामुख्याने आळू, कुर्डू, टाकळा, कंटोरोळी, आणि शेवळी यांसारख्या दुर्मिळ व गुणकारी भाज्यांची प्रदर्शने आणि विक्री केली जाते. या महोत्सवाचे मुख्य उद्देशआरोग्य व पोषण, रानभाज्यांमध्ये असलेले नैसर्गिक जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि फायबर याची माहिती मुलांपर्यंत पोहोचवणे हा असतो. याबरोबराच संस्कृती जोपासणे ग्रामीण भागातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करणे. चाळीस ते शंभरहून अधिक प्रकारच्या दुर्मिळ रानभाज्या जंगलात उपलब्ध आहेत अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
प्रारंभी रानभाज्या पाककृती स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्था सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या रानभाज्या महोत्सवाचे उदघाटन संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता कोकाटे यांनी केले. संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे यांनी या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केलं.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.