तैपेई (तैवान) : तैवानची राजधानी तैपेई येथे २६ जुलै २०२६ रोजी झालेल्या जगप्रसिद्ध ‘आयमा वर्ल्ड चॅम्पियनशिप अबॅकस अँड मेंटल मॅथ्स ऑलिम्पियाड’ स्पर्धेत अवघ्या सात वर्षीय कुमार आदिराज मेस्त्री याने जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत १५ देशांतील २२८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापूर्वी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भारतीय स्तरावरील स्पर्धेत आदिराजने ‘सुपर चॅम्पियन’ हा बहुमान मिळवला होता. आता जागतिक स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या जागतिक स्पर्धेत भारत, तैवान, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, कंबोडिया, इराक, रशिया, पनामा, व्हिएतनाम, जपान, मलेशिया, श्रीलंका, इजिप्त आदी १५ देशांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एकूण ४६ पदके जिंकली आणि सांघिक क्रमवारीत द्वितीय स्थान मिळवले, तर यजमान तैवानने प्रथम क्रमांक पटकावला. कुमार आदिराज मेस्त्री हा मुंबई येथील वंडर किडझ लर्निंग अकॅडमीचा विद्यार्थी असून, ठाणे-कोपरी शाखेच्या प्रमुख प्रशिक्षक गौरी दौंड यांनी त्याला परिश्रमपूर्वक प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आदिराजने हे उज्ज्वल यश संपादन केले. ऍकॅडमीचे संस्थापक व आशियाई प्रमुख आशुतोष पाटील, प्रमुख प्रशिक्षक लिना पाटील तसेच सहप्रशिक्षक मिस श्रुती पाटील यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे, आदिराजची बौद्धिक आणि शैक्षणिक पायाभरणी अधिक भक्कम झाली. आदिराजच्या या यशात या सर्व गुरुजनांचे मोलाचे योगदान आहे.
आदिराज सध्या न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, वसंत लॉन, ठाणे (पश्चिम) येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे. त्याचे वडील दिग्विजय मेस्त्री आणि आई अमृता मेस्त्री हे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागातील महापारेषणमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. कुमार आदिराज हा राजपत्रित अधिकारी अनुराधा मेस्त्री आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राम मेस्त्री यांचा नातू आहे. तसेच त्याच्या आईचे वडील दिवंगत दिलीप दत्ताजीराव जगदाळे यांनी महापारेषणमध्ये अधीक्षक अभियंता म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली होती. अवघ्या सातव्या वर्षी जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढविणार्या कुमार आदिराज मेस्त्रीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल विविध क्षेत्रांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.