loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रृंगारतळी याठिकाणी झालेल्या हल्ल्याचा निषेध करत व हल्लाखोर यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही होणे बाबत रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन.

वरवेली(वार्ताहर)- गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी या ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा निषेध व हल्लाखोर यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही होणे बाबत रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण यांना निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनात पुढे म्हटले आहे की, रविवार दि. २/८/२०२६ रोजी गुहागर शृंगारतळी या ठिकाणी झालेल्या रोहिदास समाजाच्या बांधवांवर काही गुंडांनी त्यांचा छळ करुन त्यांच्यावर हल्ला करून त्यांना रॉड व लाठीच्या सहाय्याने जबर मारहाण करण्यात आली असुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याचप्रमाणे जातीवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देऊन चामट्यांनो ठार मारू असे जातीवाचक शब्द वापरून मारहाण करण्यात आली, तरी अशा भ्याड व क्रूर प्रकरणी अशा मारेकरी गुंडाना पकडून व अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही झालीच पाहिजे, असे रोहिदास समाज सेवा संघ रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

अशा मारेकरी गुंडाना अटक करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही झालीच पाहीजे नाहीतर बेमुदत उपोषणास भाग पडावे लागेल, ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. यावेळी रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बाळू खेडेकर, जिल्हा सेक्रेटरी गणेश बाबुराव सरनकर, जिल्हा उपाध्यक्ष अजित आंबवकर, वंचित बहुजन विकास आघाडी जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते गुहागर तालुकाध्यक्ष विजय जानवळकर ,जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनोद जानवळकर, अशोक जानवळकर, तेजस कोंडविलकर, सचिन कोंडविलकर, संदीप कोंडविलकर, भिकुराम जानवळकर, सुधीर जानवळकर, रघुनाथ जानवळकर, विनोद चिपळूणकर सुजय जानवळकर नितेश चिपळूणकर आदी. समाज बांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg