loader
Breaking News
Breaking News
Foto

वणोशीत ‘कृषी स्नेही’ गटाकडून भातशेतीसाठी संजीवनी! गिरीपुष्पाच्या हिरवळी खताचे धमाकेदार प्रात्यक्षिक

(दापोली-सागर गोवळे)वणोशी - शेतीचा खर्च वाढतोय आणि जमिनीचा पोत बिघडतोय? मग ही बातमी तुमच्याचसाठी! कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ‘कृषी स्नेही’ गटातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वणोशी तर्फ पंचनदी येथील वडवाडीत भातशेतीसाठी अत्यंत उपयुक्त अशा हिरवळीच्या खताचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रात्यक्षिकात गिरीपुष्पाचा (ग्लिरिसिडिया) ताजा पाला भातशेतीत समान पसरवून चिखलणीच्या वेळी जमिनीत कसा गाडावा, याचे सोपे पण प्रभावी धडे देण्यात आले. गिरीपुष्पाच्या पाल्यात तब्बल २.७५% नत्र, ०.५% स्फुरद आणि १.१५% पालाश असते. हा पाला जमिनीत अतिशय लवकर कुजतो, ज्यामुळे भात पिकाला अन्नद्रव्ये लगेच उपलब्ध होतात. शेताच्या बांधावर किंवा पडिक जमिनीत गिरीपुष्प सहज उगवते. एका गुंठ्यासाठी फक्त ४ ते ६ झाडांचा पाला पुरेसा ठरतो! सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढून जमिनीची सुपीकता टिकून राहते.

टाइम्स स्पेशल

विद्यापीठाच्या संशोधनानुसार, १० टन प्रति हेक्टर गिरीपुष्पाचा पाला वापरल्यास शिफारस केलेल्या १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश या रासायनिक खतांच्या जोडणीइतकेच भरघोस उत्पादन मिळते! म्हणजेच रासायनिक खतांचा खर्च थेट अर्ध्यावर आणणे शक्य आहे. या उपक्रमात स्थानिक शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त भाग घेत आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. हा यशस्वी कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ अस्लम डोसानी, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रात्यक्षिकाच्या यशस्वीतेसाठी ‘कृषी स्नेही’ गटाच्या कोमल झिरवाळ, आकांक्षा गाडगे, सलोनी सावंत, अंकिता मुंज, नीलम मदने, साक्षी लोके, श्रुती बोबडे, तन्वी नादिवडेकर, श्रावणी मोरे व समृद्धी जाधव या विद्यार्थिनींनी विशेष मेहनत घेतली. वणोशीच्या शेतकर्‍यांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg