loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. आदर्श विद्यामंदिर पाली नं १ प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी केला सत्कार

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - जिल्हा परिषद शाळा आदर्श विद्यामंदिर पाली नं १ या प्रशालेत शिकणाऱ्य क्षितीज महेश कांबळे आणि अनुष्का महेंद्र गावडे या विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. क्षितीज महेश कांबळे हा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत आठवा आला असून नवोदय विद्यालयाच्या परिक्षेकरीता त्याची व अनुष्का महेंद्र गावडे या विद्यार्थिनीची निवड झाली आहे. हा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणावा लागेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी केला. हा सत्कार म्हणजे गुणवत्तेला मिळालेले प्रोत्साहन आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षा आणि नवनवीन संधी उपलब्ध व्हावी म्हणून पालकमंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत.‌ या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची तरंग उमटवून गेली.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे आवर्जून उपस्थित होते. तसेच या प्रशालेचे मुख्याध्यापक एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व डॉ. जनार्दन कमलाकर मोहिते आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे हे उपस्थित होते. शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg