loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई–सावंतवाडी दरम्यान रोज धावणार एक्सप्रेस! कोकणातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी!

खेड :केंद्र सरकारच्या हिरव्या कंदिलानंतर मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन एक्सप्रेस रेल्वेला मंजुरी मिळाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवेला भारतीय रेल्वेची मंजुरी मिळाली आहे. कोकणातील लाखो प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, कल्याणचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे खासदार मा. श्री. नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकण यांच्यातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असून पर्यटन, व्यापार, शिक्षण, रोजगाराला चालना तसेच कोकणकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेण, रोहा, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवलीसह कोकणातील प्रमुख शहरांना थेट रेल्वे जोडणी मिळाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासोबतच हजारो विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि पर्यटकांनाही मोठा फायदा होणार आहे.कोकणच्या विकासाला गती देणारा आणि प्रवाशांच्या सोयीला प्राधान्य देणारा हा निर्णय निश्चितच आनंददायी ठरणार आहे. राज्यमंत्री योगेश रामदास कदम यांनी सरकारच्या प्रयत्नांमुळे कोंकणी जनतेचा प्रवास सुखकर होईल ,असे म्हटले आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg