पनवेल - विचुंबे गाव येथे श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ आणि श्री कृष्णा काडवे बुवा शिष्यगण यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य बुवा कृष्णा पांडुरंग काडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या सोहळ्याची सुरुवात विचुंबे गावचे माजी उपसरपंच रवींद्र भोईर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी माजी सभापती प्रणालीताई भोईर, ग्रामपंचायत सदस्या धनश्रीताई भोईर, ग्रामपंचायत सदस्य आप्पा गायकवाड, संजय भोईर, किशोर सुरते तसेच अविनाश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे बुवा रमेश यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या प्रसंगी सुप्रसिद्ध भजनकार सुशील गोठणकर माऊली यांनी आपल्या सहपरिवार व शिष्यपरिवारासह उपस्थित राहून सुरेल भजनांची सेवा सादर केली. तसेच आदेश खंडागळे, सुप्रसिद्ध झांजवादक कमलेश सुतार, सुशील लाड, बंधुराज प्रदीप भरत काडवे, उत्कृष्ट छायाचित्रकार साईदीप पारकर तसेच इतर कलाकारांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
बाल व युवा कलाकार वेदांत काडवे, सुजल काडवे आणि शुभम संकपाळ यांनी उत्कृष्ट पखवाज व तालसाथ करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिष्यमंडळींनी गुरुवर्य कृष्णा काडवे बुवांचे अत्यंत भक्तिभावाने गुरुपूजन केले. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या भजनांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. अखेरीस कृष्णा काडवे बुवांनी गायलेल्या मधुर भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाचे सर्व सभासद, काडवे बुवा शिष्य परिवारातील सदस्य तसेच विचुंबे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती, श्रद्धा आणि गुरु-शिष्य परंपरेचे जतन करत पार पडलेला हा गुरुपौर्णिमा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.