मालवण (प्रतिनिधी)- भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण, महिला शाखा आणि संस्कार विभाग आयोजित वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ चा उद्घाटन समारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीप व धूप प्रज्वलन करून करण्यात आली. तदनंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. मालवण तालुक्याचे अध्यक्ष रविकांत कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेतील प्रथम पुष्प विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध या विषयाच्या अनुषंगाने तालुका उपाध्यक्ष माजी श्रामणेर, बौद्धाचार्य नचिकेत पवार यांनी गुंफले. तथागत भगवान बुद्धांचा विशुद्धी मार्ग हा संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरणार आहे, प्रज्ञा, समता,करुणा,शील या नीती मूल्यांना जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे, अशी भगवान बुद्धांची शिकवण आहे. म्हणून भगवान बुद्ध हे संपूर्ण जगताचे गुरु आहेत असे यावेळी पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संस्कार सचिव मिलिंद पवार आणि तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी शुभेच्छा दिल्या तर तालुकाध्यक्ष रविकांत कदम यांनी अध्यक्षीय मनोगत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्कार विभाग सचिव योगेश वराडकर यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, संरक्षण कमांडर अरुण जाधव, जिल्हा महिला शाखा संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडूरकर, जिल्हा महिला शाखा संघटक लीना तळगावकर, तालुका महिला शाखा सरचिटणीस समता डिकवलकर, संस्कार सचिव मिलिंद पवार, तालुका संघटक भरत पेंडूरकर, तालुका प्रचार पर्यटन सचिव सचिन कासले, बार्टीचे समतादूत संग्राम कासले, तालुका महिला शाखा संघटक सानिका कदम, कुणकवळे गाव शाखा अध्यक्ष संदीप कदम, मसदे गाव शाखा अध्यक्ष तानाजी कदम, वडाचापाट गाव शाखा अध्यक्ष गणेश कासले, वराड गाव शाखा अध्यक्ष राजेंद्र वराडकर, गोळवण गाव शाखा अध्यक्ष शशिकांत पवार, तळगाव गाव शाखा अध्यक्ष संदीप तळगावकर, चौके गाव शाखा अध्यक्ष रामचंद्र कदम, डिकवल गाव शाखेचे सचिव सदानंद डिकवलकर, वराड गाव शाखा कोषाध्यक्ष अरविंद वराडकर, चौके गाव शाखा कोषाध्यक्ष शुभम चौकेकर, वैभव पवार, कुणकवळे गाव शाखा महिला अध्यक्ष निशाताई कदम, संघमित्रा कदम, कुमार सुयश कदम आदी उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.