खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील केळशी खाडी पुलाच्या बांधकामासाठी साहित्य घेऊन जाणारा सुमारे ४५ टन वजनाचा अवजड ट्रेलर दापोली तालुक्यातील लोणवडी येथे रस्त्याच्या कडेला कलंडल्याची घटना आज घडली. प्राथमिक माहितीनुसार, केळशी खाडी पुलाच्या कामासाठी सुरू असलेल्या मालवाहतुकीदरम्यान लोणवडी परिसरातील अरुंद व तीव्र वळणाच्या रस्त्यावर ट्रेलरचा तोल गेला आणि तो रस्त्याच्या एका बाजूला कलंडला.
या अपघातामुळे काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रेलर हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, अवजड वाहनांची वाढती वाहतूक आणि अरुंद रस्त्यांमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढत असल्याने वाहनचालकांनी विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



















































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.