loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग वरची धाटवाडी येथे वीज वाहिनी तुटून पडल्याने तीन म्हैशींचा जागीच मृत्यू, लाखो रुपयांचे नुकसान

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुका महावितरण विभाग यांच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर कुणाचा अंकुश नाही, यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. दोडामार्ग वरची धाटवाडी शिवकृपा नगर येथे वीज वाहिन्या खराब आहेत. जीर्ण झाल्या आहेत. यातील एक वीज वाहिनी तुटून पडल्याने कसई दोडामार्ग येथील शेतकरी शिवराम वसंत साळकर यांच्या तीन म्हशी तुटून पडलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून जागीच ठार झाल्याने लाखो रुपये नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने मनुष्य हानी टळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेमुळे परिसरातून वीज महावितरण कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. माहिती देऊन देखील महावितरण अधिकारी व कर्मचारी वेळत पोहोचले नाही. दोडामार्ग ते आयी मार्गावर शिवकृपा नगर नजीक धाटवाडी येथे वीज वाहिनी तुटून पडली. पण वीज प्रवाह सुरू होता. याच दरम्यान साळकर यांची पाळीव जनावरे चरायला सोडली होती. त्यांना या वीज वाहिनीचा धक्का लागून तीन म्हशी जागीच ठार झाल्या. दरम्यान या ठिकाणी कुणी नागरिक न गेल्यामुळे संभाव्य मनुष्यहानी टळली. तीन म्हशी जागीच मृत्यू झाल्याने साळकर यांचे लाखो रुपये नुकसान झाले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg