संगमेश्वर (प्रतिनिधी) - ग्रामपंचायत कर्ली आयोजित "सक्षम महिला - सक्षम गाव" या संकल्पने अंतर्गत आयोजित महिला मेळावा व मोफत आरोग्य शिबिर अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि गाव विकासात महिलांचा सहभाग या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले जिल्हा परिषद सदस्य प्रमोद श्रीधर अधटराव यांनी उपस्थित महिला भगिनींना मोलाचे मार्गदर्शन करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात ते म्हणाले: "महिलांनी ग्रामसभेमध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे. महिलांचा ग्रामसभेत सक्रिय सहभाग असेल तरच गावचा विकास अधिक जलद गतीने होऊ शकतो. गावातील किंवा शाळेतील कोणतीही समस्या असो, ती माझ्यापर्यंत थेट पोहोचवा. मी २४ तास तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे."
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, गावातील महिला सक्षम झाल्या पाहिजेत आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत आल्या पाहिजेत. शासकीय योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे, कोणताही ग्रामस्थ योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित आरोग्य अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका चैताली शेलार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना महिला नेतृत्व विकास, गाव विकासातील महिलांचे योगदान आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक आत्मनिर्भरता कशी साधावी, यावर सविस्तर प्रकाश टाकला. महिलांनी स्वतः मधील सुप्त गुणांना वाव देऊन आत्मविश्वासाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिर मेळाव्यासह सर्व महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. धामापूर प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि इनफिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचा गावातील अनेक महिलांनी लाभ घेतला. या प्रसंगी आंबव ग्रामपंचायतीच्या सरपंच माधवी प्रमोद अधटराव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कर्ली-देवघर गावचे माजी सरपंच प्रदीप रावणंग, माजी उपसरपंच बावा चाळके, समीर चाळके, सुशील चाळके, नारायण घाणेकर, रमाकांत चाळके, तंटामुक्ती अध्यक्षा स्वाती चाळके, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन ग्रामपंचायत कर्ली यांच्या वतीने करण्यात आले असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.