वैभववाडी (प्रतिनिधी) - केंद्र शाळा खांबाळे येथे कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या 'रावे' (RAWE) उपक्रमांतर्गत कृषीदूत विद्यार्थ्यांनी एक दिवसीय भव्य 'रानभाजी प्रदर्शन आणि माहिती कोपरा' अत्यंत यशस्वीरित्या पार पाडला. या प्रदर्शनाला शालेय विद्यार्थी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सध्याच्या काळात नामशेष होत चाललेल्या आणि आरोग्यासाठी अत्यंत पोषक असणाऱ्या पारंपरिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी आळू, रानमाठ, अंबाडा, आघाडा, चिरगुळी, कवाळा, पाथरी, केना, तांदळी आणि घुळी अशा विविध प्रकारच्या दुर्मिळ व औषधी रानभाज्यांचे थेट नमुने प्रदर्शित केले होते. तसेच प्रत्येक भाजीचे मानवी शरीराला होणारे फायदे आणि गुणधर्म तक्त्यांद्वारे सोप्या भाषेत समजावून सांगितले.
रानभाज्यांसोबतच विद्यार्थ्यांनी शेतीविषयक तंत्रज्ञानाचा एक उत्तम 'माहिती कोपरा' तयार केला होता. यामध्ये खत व्यवस्थापन करताना होणाऱ्या सामान्य चुका, मित्र व शत्रू कीटक ओळखणे, पिकांवरील औषध फवारणीचे सुरक्षित नियम आणि विविध शासकीय योजनांचे माहितीपर तक्ते लावण्यात आले होते. या माहिती कोपऱ्यात पिकांच्या सविस्तर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी समाविष्ट केलेले 'क्यूआर कोड' (QR Codes) उपस्थितांसाठी मुख्य आकर्षण ठरले. याप्रसंगी केंद्र प्रमुख चेतन बोडेकर, केंद्र शाळा खांबाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शेट्ये, उपशिक्षक हनुमंत सुतार यांच्यासह शाळेतील इतर शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन व सादरीकरण कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे कृषीदूत मानसिंग बेलेकर, विनायक घाटगे, योगेश जांभळे, अनिरुद्ध चौधरी, रामकृष्ण माने, सुनील गुत्तेदार, समीर मकानदार आणि रहीम तल्लुरी या विद्यार्थ्यांनी केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.