loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील किलबिल प्लेस्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

केळंबे-लाजा (सिराज नेवरेकर) - शहरातील किलबिल प्ले स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील बालकांनी पंढरपूरच्या वारीचा देखावा साकारत उपस्थितांची वाहवा मिळविली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी हातात तुळस, टाळ, मृदुंग, घेऊन वारक-यांचा वेश परिधान केला होता. तर काही विद्यार्थ्यानी विठ्ठल रुक्मिण आकर्षक वेशभूषा करून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच मोठ्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची दिंडी काढत शाळेतच आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मुलांनी पांढरी टोपी, तर मुलींनी नऊवारी साडी परिधान करून पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवले संपूर्ण परीसर विठ्ठल.. विठ्ठल.. च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात न्हावुन गेला होता. शाळेच्या मुख्याधिपीका सुप्रिया शिगम यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजावुन सांगितले. विद्यार्थ्याच्या पालकांनीही आपल्या पाल्यांना पारंपारिक वेशभूषा सजवून उत्स्फूर्त सहभाग घेतला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg