loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले खाडी पुलावर मोकाट गुरांचे ठाण; वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या महत्त्वाच्या समस्येकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

दापोली (प्रतिनिधी) : दापोली हर्णे मार्गे आंजर्लेकडे जाणा-या खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवास धोक्याचा झाला आहेच त्यात आणखीन एका समस्येची भर पडली आहे. आंजर्ले खाडी पुलावर ठाण मांडून बसलेल्या गुरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. पुलावरील वाहतुकिला नुसताच ब्रेक बसत नाही तर गुरांच्या मोकाट बसण्याने सुरक्षित वाहतुकिस धोका झालेला असताना ही ज्यांच्या अखत्यारीत पुलाची मालकी आहे त्यांचे मात्र या महत्त्वाच्या समस्यांकडे पुर्णतः दुर्लक्ष झाले आहे. रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील कोकणच्या विकासात भर घालणाऱ्या दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडी पुलावर मोकाट गुरे हो अहोरात्र ठाण मांडून बसलेली असतात. पुलावर ठाण मांडून बसलेल्या गुरांचा त्रास हा या पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना होतो तसा तो पादचारी प्रवाशांनाही होत असतो. मात्र तरीसुध्दा सार्वजनिक बांधकाम विभाग सुरक्षित प्रवासासाठी काहीच उपाय योजना करत नाही. ही मात्र खेदाचीच बाब आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील अडखळ आणि मुडीं गावांना जोडणारा आंजर्ले नावाचा खाडी पूल आहे. या पुलावरून दापोली तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी तसेच आंजर्ले, आडे केळशी या गावांसह इळणे पंचक्रोशीतील गावांकडे तसेच देहेण सुकोंडीकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आहे. तसा तो हर्णे बंदराकडे येणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यात याच मार्गावर आंजर्ले येथील सुप्रसिध्द कड्यावरील गणपती देवस्थान असल्याने येथे देव दर्शनासाठी येणारे भक्तगण असतील वा कोकण किनारपट्टीवर भटकंतीसाठी येणारे पर्यटक असतील वा दररोज प्रवास करणारी वाहने वा प्रवासी असतील त्यांना या मार्गावरील आंजर्ले पुलावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यातील काही गुरे ही मारकुटी असतात. याचा अनुभव विशेषतः दुचाकीस्वारांनी अनेकदा घेतलेला आहे. ही बाब येथील स्थानिकांना माहीत आहे.

टाईम्स स्पेशल

वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा या मार्गावरील आंजर्ले पुलावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट गुरांचा होणारा प्रवास करणाऱ्यांना तसेच वाहतुकीसाठीचा अडथळा हा सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित करून चालणार नाही. कारण मौन जात आहे कधी उसळेल आणि कोणाचा अंत करेल याचा भरवसा नाही. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg