loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील दहिवली दरडग्रस्त कुटुंबीयांना दिलासा; महसूल मंत्र्यांकडून घर बांधण्यासाठी प्रत्येकी दोन लाखांच्या मदतीची घोषणा

खेड (दिलीप देवळेकर) - महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे रत्नागिरी जिल्हा दौर्‍यावरती असताना भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर यांच्याकडून दहिवली गावामध्ये दरड कोसळून झालेले नुकसान व स्थानिक नागरिकांच्या पुनर्वसना संदर्भात मंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये घर बांधण्यासाठी मंजूर करून दिले व अधिक मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा अधिकारी यांना अहवाल तयार करून सादर करण्यास सांगितले. विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार व भाजपा नेते तथा खेडचे मा. नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव खेडेकर यांच्या महत्त्वपूर्ण मागणीमुळे दहिवली गावातील अपघातग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg