loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडच्या आरोग्य केंद्राला ‘कै. हिराचंद पर्शराम बुटाला आरोग्यधाम’ असे नामकरणाचा नगरपालिकेचा ठराव

खेड - खेडच्या आरोग्य केंद्राला कै. हिराचंद पर्शराम बुटाला आरोग्यधाम असे नामकरण करण्याचा नगरपालिकेचा ठराव आज एकमताने मंजूर करण्यात आला. नगराध्यक्ष माधवी बुटाला यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज कै. हिराचंद बुटाला यांचा स्मृतिदिन असल्याने या ठरावाला विशेष महत्व होते. शाळेचे चेअरमन राजेश बुटाला यांनी आज झालेल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही माहिती सर्व शिक्षकांना दिली. या निर्णयाचे सहजीवन शिक्षण संस्था आणि संस्थेतील सर्व संचालक, शिक्षक वर्ग तसेच शहरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. खेड नगरपरिषदेने शिवसेना नेते रामदास कदम यांच्या सूचनेनुसार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंजूर करून घेतलेल्या निधीतून उभारण्यात येणार्‍या भव्य आरोग्य केंद्राला कै. हिराचंद परशुराम बुटाला आरोग्यधाम असे नामकरण करण्याचा ठराव नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

प्रशाला चेअरमन म्हणून शिवसेना नेते रामदास भाई, मंत्री योगेश दादा, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व सन्माननीय नगरसेवक मुख्याधिकारी यांचे प्रशालेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन ना. बा. शेलार, संचालक मिलिंद तलाठी, संजय बुटाला, आनंद कोळेकर, अरविंद तलाठी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg