loader
Breaking News
Breaking News
Foto

‘‘श्री रामेश्वर पंचायतन मंदिर कळंबस्ते साठलेवाडी हा राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा वारसा’’ - डॉक्टर विनय नातू

मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- सरदार गोविंदपंत गानू यांचे सन्मानार्थ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या शिवधनातून उभारलेली संगमेश्वर तालुक्यातील साठलेवाडी येथील श्री रामेश्वर पंचायतन मंदिर हा देवी होळकर यांचा समृद्ध वारसा असून तो जतन संवर्धन विकसित करणे या कामा समावेश छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखड्यात करण्यात आला आहे.ही समाधानाची बाब असून राधाकृष्ण मंदिर व रामेश्वर पंचायतन मंदिर समूह राज्य संरक्षित स्मारक घोषित करणे आवश्यक असून राधाकृष्ण मंदिर लगतची प्राचीन विहीर आणि रामेश्वर पंचायतन लगतची बारव यांचा शासनाच्या बारव संवर्धन मोहीम कार्यक्रमात समाविष्ट करणेबाबतची ग्रामस्थांची व देवस्थान न्यासाची मागणीचा पाठपुरावा करून ती कामे पूर्ण करून घेऊ असा विश्वास श्री रामेश्वर पंचायतन मंदिर व राधाकृष्ण मंदिर कळंबस्ते साठलेवाडी येथील पाहणी प्रसंगी सिंधू रत्न समृद्ध योजना २. ०० चे रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर सहाय्य संचालक पुरातन विभाग रत्नागिरी यांना दूरध्वनीवरून या सर्व विषयांची माहिती दिली. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यवाहीचे आश्वासन दिले. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक यांनी या मंदिर समूहाच्या परिसरात धार्मिक, पर्यटन,व ऐतिहासिक वारसा जतन करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि गाईड ट्रेनिंग, शेती विकासासाठी व धार्मिक पर्यटनासाठी संपूर्णसहकार्याचे भरीव आश्वासन दिले. या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य दीपक जाधव, श्रीरंग कुंभार, अभिनाथ आमकर, दिलीप बडद, श्रीनिवास पेंडसे यांचेसह रामेश्वर पंचायतन मंदिर न्यासाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg