loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने'तून मच्छिमारांना प्रातिनिधिक स्वरूपात सॅटेलाईट फोनचे वितरण

मुंबई (दिपक साळवी) - मच्छिमारांना समुद्रात आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, हवामान आणि सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सॅटेलाईट फोनमुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातही संपर्क साधणे शक्य होणार असून खराब हवामान, यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर संकटांच्या वेळी तात्काळ मदत मागवणे सुलभ होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने हा पुढाकार घेतला आहे. यावेळी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिस (GSPS) चे सादरीकरण करून समुद्रातील दुर्गम भागातही सातत्यपूर्ण संपर्क कसा करता येईल, याची माहिती दिली. यावेळी मंत्री नितेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg