मालवण(प्रतिनिधी)- गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिकेकडून मालवण शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, गणेश विसर्जन स्थळांवर दुरुस्ती व सोयी पुरविणे, शहरात पार्किंग झोन तयार कारणे आदी कामे दि. २८ जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करून कार्यारंभ आदेशही देण्यात आले असून लवकरच ही कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी दिली आहे. तसेच शहरातील स्ट्रीट लाईट दुरुस्तीची कामे करण्यात येणार असून रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडणे व डास प्रतिबंधक फवारणीची कामे सुरु करण्यात आल्याचेही सौ. वराडकर यांनी सांगितले आहे. गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात नागरिकांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी तसेच कोणत्याही समस्या उद्भवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तत्पर आहोत, असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी म्हटले आहे. या अनुषंगाने २८ जुलै रोजी नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत काही आवश्यक कामे नगरपालिका निधीतून आणि वार्षिक ठेकेदारीतून मंजूर करण्यात आली आहेत. तसेच या कामांना ३१ जुलै रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
या कामांमध्ये मालवण नगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येणार असून पावसाचा अंदाज घेत गणेश चतुर्थीपूर्वी शहरातील रस्त्यांची योग्य ती डागडुजी करण्यात येणार आहे. तर मालवण कचेरी - फोवकांडा पिंपळ - भरडनाका ते देऊळवाडा या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीतील रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत, रस्त्यांची उत्तमप्रकारे डागडुजी होण्यासाठी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर प्रयत्नशील आहेत. शहरात अनेक रस्त्यांच्या दुतर्फा झाडी वाढलेली असल्याने गणेशोत्सवात त्याची अडचण होऊ नये यासाठी झाडी तोडण्याचे काम नगरपालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डास प्रतिबंधक फवारणी मोहीम देखील राबविण्यात येत असून हे काम आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
शहरातील गणेश विसर्जन स्थळांची दुरुस्ती करून तेथील जलस्रोतातील गाळ काढून वाळूचे रॅम्प तयार करण्यात येणार आहेत. तसेच विसर्जन स्थळी आवश्यक लाईट व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारी वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन शहरात पार्किंग झोन तयार करून बॅरीकेट्स व फलक लावणे, वाहनतळांचे सीमांकन करणे व पट्टे मारणे आदी कामेही करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील स्ट्रीट लाईटची दुरुस्तीही करण्यात येणार आहे. या सर्व कामांमध्ये उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव तसेच नगरसेविका शर्वरी पाटकर, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, नगरसेवक महेश कोयंडे, महेश कांदळगावकर, ललित चव्हाण, रविकिरण तोरसकर, मंदार केणी तसेच प्रशासन यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे. गणेशोत्सवाचा कालावधी नागरिकांसाठी विनासायास पार पडावा, यासाठी सर्वांच्या सहकार्याने लवकरच ही कामे पूर्ण केली जातील, असे वराडकर यांनी सांगितले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.