संगमेश्वर (सत्यवान विचारे) - तालुक्यातील शेनवडे येथील अवघ्या १० वर्षीय श्लोकने आपल्या नमन नृत्य सादरीकरणातून सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवशंभो नाट्य नमन मंडळाच्या कार्यक्रमातील त्याच्या सादरीकरणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्याच्या अभिनय व नृत्यकौशल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल १६ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई येथे शिवशंभो नाट्य नमन मंडळाचा नमन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्लोकने 'गौळणी'ची भूमिका साकारत प्रभावी नृत्य सादर केले. त्याच्या हावभाव, अभिनय आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्याच्या कलेचे कौतुक केले आहे. श्लोक हा प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असून लहानपणापासूनच त्याला नृत्य, अभिनय आणि पारंपरिक लोककलेची आवड आहे. लोककलेची परंपरा जपण्याच्या उद्देशाने त्याने नमन कलेत सहभाग घेतला. कमी वयातही त्याने सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर रंगमंचावर आत्मविश्वासाने उभे राहत स्वतःची वेगळी छाप पाडली आहे.
श्लोक म्हणाला, "आपली लोककला टिकून राहावी म्हणून मला नमनमध्ये सहभागी व्हायचे होते. मी माझ्या आई आणि मामाला याबाबत सांगितले. त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. माझी आई आणि मामा संयोग यांनी तब्बल एक महिना माझी तालीम घेतली. रंगमंचावर नमन सादर करताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो." श्लोकच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचे प्रोत्साहन, सातत्यपूर्ण सराव आणि लोककलेबद्दलची जिव्हाळ्याची भावना महत्त्वाची ठरली आहे. सोशल मीडियावर त्याच्या सादरीकरणाला मिळालेला प्रतिसाद हा केवळ एका चिमुकल्या कलाकाराच्या यशाचा सन्मान नसून, कोकणातील समृद्ध नमन परंपरेला नव्या पिढीकडून मिळत असलेल्या बळाचीही साक्ष देणारा ठरत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.