loader
Breaking News
Breaking News
Foto

भंडारी हायस्कुलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त रोटरी क्लबतर्फे प्रगतशील शेतकरी डॉ. उत्तम फोंडेकर यांचा सत्कार

मालवण (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी समजू नये, अनेकांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे, प्रेरणे शिवाय माणूस घडत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी महान पुरुषांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे तसेच व्यसनापासून दूर राहावे असे प्रतिपादन कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी व राज्यशासन पुरस्कार प्राप्त डॉ. उत्तम फोंडेकर यांनी येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ मालवण तर्फे मालवण येथील भंडारी ए सो हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम तसेच प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांचा आंबा व्यवसायातील प्रगती व लाल शेवग्याचे वाण विकसित करून त्याचे पेटंट मिळविल्याबद्दल रोटरी क्लबतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते गुरुपौर्णिमा कार्यक्रमात व्यासमुनी व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबच्या सचिव सौ. प्रविणा शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी व्यासपिठावर रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षा नीलम जोशी, सचिव प्रविणा शिंदे, खजिनदार प्रदीप सामंत, भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. फोंडेकर यांनी सत्काराला उत्तर देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक बनसोडे यांनी मनोगत व्यक्त करत रोटरी क्लबच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन शिंदे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg