loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; विविध समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा; जनसेवेची परंपरा कायम;

पनवेल (प्रतिनिधी) - समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर पनवेलमधील मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी शुभेच्छांसाठी गर्दी केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त, राज्यातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राज्याचे कार्यकुशल लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री भरतशेठ गोगावले, भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आमदार महेश बालदी, आमदार किसन कथोरे, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार महेंद्र थोरवे, सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांनी तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, प्रशासकीय, विधी, पत्रकारिता, वैद्यकीय, संगीत, नाट्य, सामाजिक संस्था, संघटना, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिष्टचिंतन केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg